Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मामाचा गाव रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी, बोईसर/पालघर 27, डिसेंबर :- नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांसह मामाचा गाव रिसॉर्टला आलेल्या एका नऊ वर्षीय मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. रुद्र देविदास वाडकर असे मृत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावचा रहिवाशी होता.
चिल्हार – बोईसर रस्त्यावरील गुंदले गावात “मामाचा गाव” रिसॉर्ट आहे. याठिकाणी स्वीमिंग पूलजवळ लाईफ गार्ड नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आलेल्या रुद्रचा बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्यात बुडाल्याचे कळताच त्याला तातडीने बेशुद्धावस्थेत जवळच्या
नागझरी नाक्यावरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, पालघर जिल्ह्यात डहाणू,पालघर, वाडा , वसई विरार या ठिकाणी अनेक रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. परंतु यातील बहुतांश रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूल जवळ जीवरक्षकांची नियुक्ती केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये पर्यटकांचे बळी जात आहेत. मृत मुलाच्या मृत्यूप्रकरणी रिसॉर्टमालक आणि व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.