Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चामोर्शी येथील एचपी पेट्रोलपंपसमोरील घटना

चामोर्शी, दि. ३१ डिसेंबर: भरधाव पोलीस वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली मार्गावरील एचपी पेट्रोलपंपसमोर घडली.

अविनाश मुजुमदार (५९) रा. गौरीपूर असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अविनाश मुजुमदार हा आपली दुचाकी क्रमांक एमएच ३३ ई ८५५९ ने पेट्रोल पंपाकडे जात असतांना गडचिरोली वरून चामोर्शीकडे येणाऱ्या पोलीस विभागाच्या वाहनाने त्याला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आ. डॉ. देवराव होळी यांना  माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सदर घटनेची पाहणी केली व चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनाम्यास प्रारंभ केला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.