Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज फैसला होऊ शकलेला नाही.

पुढची सुनावणी १ ऑगस्टला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली  20 जुलै :-  एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी तातडीने होण्याचा आग्रह धरला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांचे वकील हरिश साळवे यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत हवी असल्याचे सांगितले. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही या प्रकरणाला घटनेतील अनेक कायद्यांचे कंगोरे असल्याचे म्हटले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे.दरम्यान,  या प्रकरणी सर्व पक्षकारांनी 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्राची कागदपत्र सादर करण्याची वेळ देण्यात आली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपच्या मदतीने राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असले, तरी अद्याप याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच राज्य सरकार आणि शिवसेनेच्या पुढील भवितव्याचा फैसला होणार आहे. आज याप्रकरणी सुनावणी झाली. आता पुढील तारीख 1 ऑगस्ट देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.