Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिस – नक्षल मध्ये चकमक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

धानोरा /गडचिरोली  10 फेब्रुवारी :- गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या धानोरा तालुक्यातील पोलिस उपविभाग पेंढरी अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पोलिस – नक्षल मध्ये चकमक उडाली असून यात पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल शस्त्र साठा सोडून पसार झाले.

गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना माहिती होताच पोलिस विभागाने रणनीती आखुन नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 3.30 वा. दरम्यान सदर जंगल परिसरात 20 ते 25 च्यां मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला असता पोलिस विभागाच्या विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने जशास तसे उत्तर दिले पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा आसरा घेत पसार झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी झालेल्या चकमकीत घटनास्थळी जवानांनी घटनास्थळी पिंजून काढले असता दरम्यान सदर जंगल परिसरात, नक्षल्याच्या दैंनदिन वापरता येत असलेले पिठ्ठु व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य सापडले असून त्यास हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठें यश प्राप्त झाले. सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र कुरून कोंबिग आप्रेशन सुरु असुन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.