Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!… लाईनमनने ग्रा.पं. कर्मचाऱ्याला वीज खांबावर चढवले अन् वीज पुरवठा सुरू होताच जिवंत विद्युत तारेलाच चिटकला!

लाईनमनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. १६ मार्च: शेतातील मुख्य वीज वाहिनीच्‍या खांबावर चढून दुरुस्‍तीचे काम करतांना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची दुर्दैवी  मृत्यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे १६ मार्चला घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी त्‍याच्‍यासोबत लाईनमनही होता पण तो घटनेनंतर फरार झाला. घटनेची माहिती गावात कळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्‍थळी जमले. जोपर्यंत लाईनमनविरोधात गुन्‍हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही, अशी भूमिका घेतली.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याची दखल घेत साखरखेरडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी लाईनमनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर तीन तासांनी खांबावरून मृतदेह खाली उतरविल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृतकाचे नाव विश्वंभर श्रावण मांजरे असुन ते ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी आहेत तर आरोपी लाईनमनचे नाव प्रशांत देशमुख असून यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान लाईनवर बिघाड निर्माण झाल्याने त्याची दुरुस्ती करायची आहे म्हणून लाईनमन प्रशांत देशमुख यांनी विश्वंभर मांजरे यांना लाईन दुरुस्तीच्या कामासाठी नेले. लाईनमनला खांबावर चढता येत नसल्याने त्यांनी माजरे यांना खांबावर चढवले.  त्यासाठी लाईन बंद करण्याचा सबस्टेशन मधून परवाना घेतला मात्र अचानकच वीज पुरवठा सुरू झाल्याने विश्वंभर मांजरे हे विजेच्या ताराला चिटकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच गावात वाऱ्यासारखी पसरली. घरातील कर्तबगार गेल्याने कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे. तर गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.    

Comments are closed.