Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम अविलंब सुरू करा – खा. अशोक नेते

  • तारांकित प्रश्नान्वये खासदार अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ मार्च: सन २०११-२०१२ च्या बजेट मध्ये केंद्र शासनाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा-गडचीरोली या नवीन ब्रांडगेज रेल्वे लाईनच्या कामाला मंजुरी दिली.  सन २०१५ मध्ये या मार्गासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली मात्र अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे क्षेत्रातील नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गातील अडसर दूर करून निधीची तरतूद करून यथाशिग्र काम सुरू करण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि २४ मार्च रोजी तारांकित प्रश्नां अंतर्गत लोकसभेत केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

   गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल, नक्षल प्रभावित, अतिमागास, उद्योग विरहित, जंगल व्याप्त व आकांक्षीत क्षेत्र आहे. येथे उद्योगधंदे, कारखाने नसल्याने जिल्हा विकासापासून कोसो दूर असून येथील सुशिक्षित युवक बेरोजगार आहेत तसेच येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना मागासलेपणाचे जीवन जगावे लागत आहे. जिल्ह्यात रेल्वे लाईन नसल्यामुळेच उद्योग येऊ शकले नाहीत असेही यावेळी निवेदन करतांना खा. अशोक नेते यांनी सांगितले.

 तारांकित प्रश्न अनव्ये रेल्वेचा प्रश्न उपस्थित करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दूरदृष्टी ठेवून मागास जिल्ह्यांना आकांक्षीत जिल्हे घोषित केल्याने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे मी आदरणीय मोदीजींचे मनापासुन आभार व धन्यवाद मानतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

     खासदार अशोक नेते यांनी मंत्री महोदयांना प्रश्न उपस्थित केला की, वडसा- गडचिरोली या ब्रांडगेज रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू झाले आहे का? असल्यास बांधकामाची सद्यस्थिती काय आहे?   नसल्यास बांधकामास विलंब होण्याची कारणे काय?  तथा सदर बांधकाम केव्हापासून सुरू होईल व केव्हा पूर्ण होण्याची शक्यता आहे? असाही प्रश्न उपस्थित करून  दुसरा पूरक प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्र शासनाने या रेल्वे मार्गाच्या वाढलेल्या निधी १०९६ कोटी रुपये पैकी ५० टक्के वाटा म्हणजेच ५४८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे काय? असाही प्रश्न यावेळी खासदार अशोक नेते यांनी संसदेच्या सभागृहात मा. रेल्वे मंत्र्यांना विचारला तसेच महाराष्ट्र शासनाने आपल्या वाट्यातील ५४८ कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाची मान्यता देऊन  चालू आर्थिक वर्षात रेल्वे मार्गाचे काम सुरू होण्यासाठी अंतरिम निधी म्हणून ७७ कोटी रुपये मंजूर करून तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत केली.

Comments are closed.