Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नांतून चिमुरला २ मिनी व्हेंटिलेटर

  • केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून व्हेंटिलेटरची सोय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २६ एप्रिल: चिमूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना, व्‍हेंटीलेटर व ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतांना लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लोकसभा क्षेत्रासाठी ४०० मिनी व्हेंटिलेटर देण्याबाबत विनंती केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी २०० व्हेंटिलेटर देण्याचे आश्वासन दिले व त्वरित १० सिलेंडर उपलब्ध करून दिले. त्यापैकी चिमूरसाठी २ मिनी व्हेंटिलेटर (Bipap) खा. अशोक नेते यांनी चिमूर चे ज्येष्ठ नेते प्रदेश सदस्य डॉ. श्यामजी हटवादे यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर, ब्रम्हपुरीचे तहसीलदार पवार, जि.प. चे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री क्रीष्णाजी सहारे, भाजपा नगर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, भा.ज.यु. मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, युवा मोर्चा नगर महामंत्री स्वप्नील अलगदेवें उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चिमूर व लोकसभा क्षेत्रासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली ही मदत उल्लेखनीय आहे. या मिनी व्हेंटिलेटरच्या साह्याने रुग्णांना उपचारासाठी मोलाची मदत मिळणार आहे, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.

Comments are closed.