Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चामोर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम २० दिवसात पूर्ण करा – खा. अशोक नेते यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी :- गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी ते तळोधी पर्यंतच्या रस्त्याचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झालेले आहे. तळोधी ते चामोर्शी शहरापर्यंतचा रस्ता गेल्या ३ महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे. मात्र अजूनही काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास रस्त्यावर २ ते ३ फूट पाणी साचेल व रहदारीस अडचण निर्माण होईल. या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

आज खा. अशोक नेते हे चामोर्शी च्या दौऱ्यावर असतांना शहरातील नागरिकांनी चामोर्शी शहरांतून जाणाऱ्या मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल ही बाब खा. निर्दशनास आणून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खा. अशोक नेते यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांना दूरध्वनी करून चामोर्शी शहरातील रस्त्याचे काम २० दिवसात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांना रस्ता सुरळीत करून देण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात पाणी साचून चारचाकी वाहने व पायदळ जाणाऱ्या नागरिकांना अडचण होणार असल्याने हे काम जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देशही खा. अशोक नेते यांनी दिले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करा – खा. अशोक नेते

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त, 137 नवीन कोरोना बाधित तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू

 

 

Comments are closed.