Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षांबाबत आज केंद्र आणि राज्यातील मंत्र्याची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीनंतर, ‘विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ’ , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे. तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट क करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

लसीकरणाची मागणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत मांडली.

अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरु

अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमची प्राथमिकता आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांची चर्चा सुरु आहे.

हे देखील वाचा : 

ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?

धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

 

Comments are closed.