Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्यवर्धनी केंद्र आलापल्लीत मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : आरोग्यवर्धनी केंद्र आलापल्लीला नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने केंद्राअंतर्गत असलेल्या  वेलगुर, किष्टापूर, पूसकुपल्ली, नागेपल्ली येलचिल इत्यादी गावांना रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने नागरिकांसाठी मोठी संजीवनी ठरली आहे.

शासनाकडून राज्यभरात देण्यात आलेल्या रुग्णवाहिकामध्ये गडचिरोली जिल्ह्याला ८ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून त्या रुग्णवाहिका जि. प. गडचिरोली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या गावांना रुग्णवाहिका अभावी रुग्णालयात आपातकालीन परिस्थितीत रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसलेल्या अश्या आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे नागरिकांची आरोग्याची अडचण समजून जि. प. अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या मार्फतीने नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये हर्ष उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा परिषद गडचिरोली कडून आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्लीत दाखल होताच त्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या लोकार्पण सोहळ्यात आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, जि.प.सदस्य अजय नैताम, पंचायत समिति सभापती भास्कर तलांडे उपसरपंच विनोद आकनपलीवार, ग्राम पंचायत सदस्य स्वपनिल श्रीरामवार ग्रा. प. सदस्य सोमेश्वर रामटेके, वैद्यकिय अधिकारी डॉ. अलका उईके, औषध निर्माण अधिकारी सिद्धार्थ नरहरी, आरोग्य सेवक दत्तू मडावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कु. संबोधी मेश्राम, आरोग्य सेविका कोसनवार, जुमनाके, वाहनचालक सत्यनारायण लेकूर दीपक कुसनाके, उरेते व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

जिल्ह्यात लसीकरणासाठी सर्वस्तरावर जनजागृती करावी – मंत्री विजय वडेट्टीवार

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही, 95 कोरोनामुक्त तर 24 नवीन कोरोना बाधित

 

Comments are closed.