Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यासाठी 15880 शेतकर्यांना प्रत्येकी रु. 500 प्रती एकर धानाचे सवलतीच्या दराने बियाणे उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 08 जून : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 या योजनेतील भात, तुर, इत्यादी प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतिल धान (वाण) 1247 किंव्टल व 10 वर्षावरील धान (वाण) 623 किंव्टल आणि 10 वर्षा आतिल तूर (वाण) 21 क्वी. 10 वर्षा वरील 13 क्वी चे भौतिक लंक्षाक आहे. तसेच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याला 2100 क्वी. भात बियाणे चे लक्षांक आहे. त्या अनुषंगाने 15880 शेतकर्यांना त्याचा लाभ मिळणार असून जिल्ह्यात 1787 शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेले आहे.

उर्वरित 14093 शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज केलेला नसेल त्या शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालायत जाऊन अथवा गावातील सबंधित कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून बियाणे घटकाचा लाभ घ्यावा. लाभार्थ्यांना धान बियाणे साठी प्रती एकर 500 रु. व तूरपिकाकरीता 250 प्रती एकर अनुदान मिळणार असून याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली , भाऊसाहेब सा. बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

शेतकऱ्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 64 कोरोनामुक्त, तर 57 नवीन कोरोना बाधित

नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

Comments are closed.