Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 26 जून : राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे राजर्षि शाहू महाराजांच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याचे आज सामाजिक कार्यकर्ते प्रा. गहाणे यांच्यामार्फत जिल्हा माहिती कार्यालय येथे फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्र.तहसिलदार किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सामाजिक न्याय दिना निमित्त प्रा.गहाणे यांनी शाहू महाराजांनी दुर्लक्षित घटकाबद्दल केलेल्या कार्याचे तसेच अस्पृश्यता कमी करण्यासाठी केलेले कार्य, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे यावेळी उजाळा दिला. शाहू महाराजांनी दुर्लक्षित घटकांना नोकऱ्या दिल्या. सार्वजनिक ठिकणी अन्नछत्रे, धर्मशाळा, रेस्टहाऊस, सार्वजनिक विहिरी, शाळा, दवाखाने, तलाव या ठिकाणी अस्पृश्यता पाळायची नाही असा कायदा अंमलात आणला असे विविध सामाजिक क्रांतिकारक निर्णय घेत सामाजिक क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांनी सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे यावेळी श्री. गहाणे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना योजनांच्या पुस्तिकेचे वाटप
सामाजिक न्याय विभाग येथे शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजेश पांडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या “समाज कल्याण-योजनांची माहिती” पुस्तिकेचे वाटप समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

यावेळी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे माहिती देण्यात आले. या कार्यक्रमाला राजेश पांडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, बी एम मेश्राम व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

Comments are closed.