Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘या’ बाजार समितीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी सोमवारपासून बंद आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम :  केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान पश्चिम विदर्भातील सोयाबीन ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी सोमवारपासून बंद आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ बाजार समिती बंद असल्याने बाजार समितीतील करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.  केंद्र सरकारने मूग वगळता सर्वच कडधान्यांवर साठेबाजी वर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याचा निषेध नोंदवण्यासाठी व्यापारी संघटनांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, दरम्यान पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार पेठ समजली जाणारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड या सर्वच बाजार समित्या बंद असणार आहेत.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी, जनजीवन झाले विस्कळीत

भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट

भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

 

 

Comments are closed.