Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीएनजी साडेतीन तर पीएनजी दीड रूपयाने झाला महाग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  05 नोव्हेंबर :- महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात किलो मागे 3.50 रूपए आणि पीएनजीच्या दरात 1.50 रूपये वाढ जाहीर केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर किलोमागे 89.50 रूपए तर पीएनजीचा दर 54 रूपए इतका झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या आणि पीएनजीच्या दरात वाढ केल्याने मुंबई आणि परिसरात 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. सीएनजी आणि पीएनजच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना चांगलाच झटका बसणार आहे.

वाढलेल्या दराचे परिणाम पब्लिक ट्रान्सपोर्टवरही होउ शकतो. पब्लिक ट्रान्सपोर्टचे दर ही वाढू शकतात. महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यात आता पुन्हा सीएनजी-पीएनजी दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा नॅचरल गॅसच्या किमतीत बदल करतात. मार्च आणि एप्रिल मध्ये नवे दर निश्चित केले जातात. पण आता ही परंपरा मोडीत निघाली आहे. सरकार ने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमये सलग दोन वेळा सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीएनजीच्या वाढलेल्या दर रचनेतही मुंबईत पेट्रोलच्या दराच्या तुलनेत सीएनजीमुळे ग्राहकांची 42 टक्के बचत होईल तर एलपीजी सिलेंडरच्या दराच्या तुलनेत पीएनजीच्या घरगुती पाईपच्या दरामुळे 8 टक्के बचत होईल असे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.