Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, 24 नोव्हेंबर :-  दिनांक 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत ठरेल व शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होईल,हे उद्दिष्ठ ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),कृषि विभाग व सर्व संलग्न विभाग मार्फत बचत गटांचे प्रदर्शन व उत्पादन विक्री देखील ठेवण्यात आलेले आहे.

जिल्हयात कृषि क्षेत्रात काम केलेल्या प्रगतशिल व उदयन्मुख शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली यांनी अशा शेतकऱ्यांनी कामाचा तपशिलासह प्रस्ताव सबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन प्रस्ताव सादर करावेत. तसेच इच्छुक कृषि व कृषि संलग्न उत्पादनाची कृषि पुरक उत्पादकांनी विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल ची नोंदणी प्रकल्प संचालक (आत्मा), गडचिरोली यांचे कार्यालयात दिनांक 10 डिसेंबर 2022 पर्यंत करावी. स्टॉल ची संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. नोंदणीकरीता स्टॉलसाठीचे शुल्क आत्मा कार्यालय गडचिरोली मार्फत कळविण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त महिला बचत,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी व विक्रेता यांनी जिल्हा कृषि महोत्सव -2022 या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन प्रकल्प संचालक,आत्मा गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बार्टीच्या वतीने संविधान दिन निमित्ताने जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह

पत्रकारांसाठी ‘मॅरॅथॉन शुल्क` माफ करा !

Comments are closed.