Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११४९ प्रकरणे यशस्वीपणे निकाली

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1149 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित 10190 न्यायालयीन प्रकरणे व दाखलपूर्व 16072 प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 558 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 591 अशी एकूण 1149 निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची २२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 1 कोटी 59 लक्ष 5 हजार रुपये वसुल करण्यात आले. तर धनादेश प्रकरणांपैकी 71 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील 1 प्रकरण निकाली निघाले.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.