Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२० भरमार बंदुका नागरिकांकडून पोलिसांचे स्वाधीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. ८ डिसेंबर: दिनांक २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ रोजी सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी २० भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतुन नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या २० भरमार बंदुका दिनांक- ८ डिसेंबर २०२२ रोजी उपपोस्टे दामरंचा येथे पोलीस दलाच्या स्वाधिन केल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 हे देखील वाचा : 

नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन

 

‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 

 

 

.

Comments are closed.