Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृद्ध महिलांना पैशाचे बनावट बंडल दाखवून दागिने चोरणाऱ्यास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई 28 ऑक्टोबर :- वृध्द महिलांना पैशांचे बनावट बंडल दाखवून दागिने लंपास करुन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे. माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ०९/०९/२०२२ रोजी तक्रारदार श्रीमती ज्योती दत्ताराम सकपाळ, वय ६५ वर्ष या वसई स्टेशन परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या असता दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवून कोणाचा काहीही भरोसा नाही असे बोलून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडील सोन्याच्या कुड्या, चैन व कानातील साखळ्या असे एकूण रु.५५,०००/- किंमतीचे दागिने काढून देण्यास भाग पाडून हातचलाखी करुन फिर्यादी यांना मूळ दागिन्यांच्या बदल्यात रुमालातून माती खडे देवून त्यांची फसवणूक केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने माणिकपुर पोलीस ठाणे गु.र.क्र. ३१९/२०२ भा.द.वि.सं. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी हे पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करीत असल्यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन माणिकपुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या अनुषंगाने आरोपींना निष्पन्न करुन दि.१९/१०/२०२२ रोजी अर्जुन सलाट ऊर्फ मारवाडी यास नेवालीगाव, हाजीमलंग, कल्याण येथुन सापळा रचुन अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोपी व त्याचे सहका-यांनी पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे करुन वृध्द महिलांची फसवणूक केल्याची माहिती दिली असून त्याचेकडुन अंदाजे ७९.५ ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत रुपये. २,७८,१२३/- रकमेचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्री.संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीमती पद्मजा बड़े सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संपतराव पाटील, वरिष्ठ पोली- निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स. पो. नि. सचिन सानप, पो.उ.नि. तुकाराम भोपळे, पो.ह. शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण, धनंजय चौधरी, पो. शि. प्रविण कांदे यांनी केलेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.