Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : पैसे दिले नाहीत म्हणून सख्या आईच्या छातीत स्क्रूड्राइवर घुपसून निर्घृण खून केल्याची घटना आज मुंब्र्यात घडल्याने रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली.

विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात आपली आई, उर्मिला सोबत रहात होता. विशाल जे काही कमवायचा ते उडवून टाकायचा व आईकडे सतत पैश्यांची मागणी करत रहायचा त्यामुळे मायलेकात कायम खटके उडत असत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज दुपारी देखील पैश्यांवरून दोघात चांगलीच खडाजंगी सुरु झाली व राग अनावर झाल्याने विशाल याने जवळच पडलेल्या स्क्रूड्राइवर आईच्या छातीत खुपसला. त्याने केलेला वार एवढा गंभीर होता की आई जागीच गतप्राण झाली.

मुंब्रा पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी विशालला अटक केली व मयत उर्मिला हिचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवून दिले अशी माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Comments are closed.