Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! साताऱ्यात ट्रिपल मर्डर..तिहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सातारा, दि. १७ जून : साताऱ्यात एका माथेफिरू प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेसह तिच्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दत्ता नारायण नामदास असे या क्रूरकर्मा प्रियकर आरोपीचे नाव असून त्याने अगोदर प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आणि नंतर तीच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून देऊन त्यांचीही हत्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दत्ता नामदास आणि योगिता हे काही वर्षांपासू एकत्र राहत होते. योगिता हिला एकूण तीन मुलं असून, तिच्या एका मुलीचे लग्न झाले असून. तर समीर आणि तनु ही दोन मुलं त्यांच्यासोबत राहत होती.

१५ जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून प्रियसी योगिता नामदास आणि दत्ता नामदास यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर दत्ता याने योगिताचा गळा दाबून तीची हत्या केली. त्यानंतर काही वेळाने त्याने समीर आणि तनु या दोन मुलांना गवशेजरी असलेल्या विहिरित ढकलून दिले. या तिघांची हत्या करून आरोपी दत्ताने वेलंग येथील येथील घराला कडी लावून त्याच्या अकलूज येथील मूळ गावी पलायन केले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रहिमतपूर पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला ताब्यात घेतले असून मळ्यातील विहिरीतून मुलांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असुन घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेने सातारा जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.