Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

– अहेरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २ मे: अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणाऱ्या एका वाहनासह ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा तंबाखू व पन्नी जप्त केली आहे. तसेच एका व्यापाऱ्याकडून २९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ६ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीच्या आधारे अहेरी पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या आलापल्ली येथील एका किराणा गोदामाची तपासणी केली. यावेळी त्या गोदामात २९ हजार २५० रुपयांचा तंबाखू आढळून आला. हा माल चंद्रपूर येथून आला असून तंबाखूजन्य पदार्थ आणून देणारे वाहन शहरातच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्या वाहनाचा शोध घेत आलापल्लीतील मुख्य रस्त्यावर अशोक लेयलँड कंपनीच्या वाहनाला अडवून तपासणी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान त्या वाहनात २ लाख ५० हजारांचा तंबाखू व ३७ हजार ५०० रुपयांची पाच पोते पन्नी आढळून आली. पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आलापल्लीतील एका व्यवसायिकावर व वाहन चालकावर अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पडोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व मुक्तीपथ तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक मारोती कोलावार यांनी केली.

Comments are closed.