Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

ब्रम्हपुरी तालुक्यातील रंगमोचन फाट्या लगतची घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. २७ जानेवारी:- आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील रंगमोचन फाट्यानजीक ट्रक्टर व कारच्या भीषण अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

          मृतक आनंद गण्यारपवार

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज सकाळच्या सुमारास चामोर्शी वरून स्वतःच्या कार नी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार व भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार हे दोघे बांधव आपल्या वैयक्तिक कामासाठी नागपूरला जात असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रंगमोचन फाट्याजवळ  कार क्रमांक MH 33 V 245 ने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

यात कार मधील भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार जागीच ठार झाले तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जि. प. चे माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरचे दोन भाग झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती पोलीस विभागाला माहीत होताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा अधिक तपास केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत पोहचविली. अतुल गण्यारपवार यांना अधिक उपचारासाठी नागपुरात हलविले जाणार असल्याची माहिती आहे.

सदर घटनेचा वृत्त गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात माहित होताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

हे देखील वाचा : 

धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झेंड्यासमोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न..

 

Comments are closed.