Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी थेट राज्याबाहेर कारवाई करीत बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून २४ किलो चांदी आणि २ किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत १ कोटी पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले आहे.

अश्विन कुमार हा २०१७ मध्ये जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला २० ते २१ डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संबंधित बातमी  :  मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक

लखनऊमधून सौरभ तिवारीला अटक : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुण्यात आणून पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.

तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख जप्त :

प्राप्त माहितीनुसार पुणे पोलिसांच्या वतीनं तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. तुकाराम सुपेच्या मित्राकडून ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. २४ तासात सुपेचे ६३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. तुकाराम सुपेकडून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे देखील वाचा : 

पिंपळाच्या वृक्षाची अवैध कत्तल थांबवून वन विभागाने दिले जिवनदान…

संपावर असलेल्या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा झटका

विविध क्षेत्रातील स्त्री शक्तीचा “सुपर वूमन अवॉर्ड” देऊन सन्मान

 

 

 

Comments are closed.