Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्यात एका महिला ठार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दी,१५ : जंगलात जळावू सरपण गोळा करीत असताना आज दुपारच्या सुमारास वाघाने एका महिलेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मृतक महिलेचे नाव माया धर्माजी सातपुते (५६) असून मौजा गोविंदपुर जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक महीला थंडीचे दिवस तसेच घरगुती स्वयंपाक, गरम पाणी करण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून महिलेला जागीच ठार केल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

वाघाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकरी वर्ग बाहेर निघण्यासाठी घाबरत आहेत.सध्या लागवड केलेले पिक हाती आले असल्याने पीकाची देखरेख करणे काळाची गरज आहे.अन्यथा पिकांची नासधूस झाली होती तर उपासमारीची वेळ निर्माण होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावात घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धाव घेत गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच घटनास्थळी पोलीस विभागांची चमू आणि वनविभागाची रेस्क्यु टीम रवाना होवून मोका पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदन करण्यासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

गडचिरोली,आणि वड्सा वनविभागात दिवसेंदिवस वाघांच्या घटनेत वाढ झाल्याने स्थानिक गावातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने सदर परिसरात वावर असलेल्या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments are closed.