Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ .बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व कडू रियालिटीज, पुणे आणि स्वयंदीप फाउंडेशनच्यावतीने मलेशियामध्ये महाराष्ट्रातील 22 जणांचा गौरव

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, दि.11: स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे व कडू रियालिटीज पुणे यांच्या वतीने
सिंगापूर आणि मलेशिया या दोन देशांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 22 मान्यवरांना मलेशिया येथे हॉटेल रमाडा येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमाला मलेशिया येथील नुखा बास्नेट, मुंबई येथील माजी सनदी अधिकारी शिवानंद टाकसाळे यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने दरवर्षी विविध देशांमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यात येतो.

यावर्षी मलेशिया, सिंगापूर या देशात दि. 26 मे रोजी मलेशिया येथील रमडा या हॉटेलमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात सनदी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उर्मिला टाकसाळे,पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.गौतमी पवार, बी .जे .वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.प्रेरणा कदम एसएससी बोर्डाचे माजी संशोधन अधिकारी गोवर्धन सोनवणे ,अंजली सोनवणे , अभियंता एच.डी. तुरेराव डॉ. प्रतीक कदम, नांदेडमधील प्रतियश लेखक, साहित्यिक डॉ. विलास ढवळे, शिक्षिका प्रमिला रायबोले, शिक्षिका वंदना खोकले, मच्छिंद्र नाईक, महावितरणच्या कार्यकारी अभियंता रेखा लोणे, अभियंता अनिलराव लोणे ,माजी वैद्यकीय अधिकारी तथा ज्येष्ठ नाटककार डॉ. विजयकुमार माहुरे, डॉ मंदाकिनी माहुरे,शिक्षक बालाजी ढगे,उद्योजक देविदास बोंडे, श्रेयश टाकसाळे प्रा. भगीरथी सोमवाड, निवृत्त अधिकारी जयवंत सोमवाड
यांचा समावेश होता .

Leave A Reply

Your email address will not be published.