Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलिया आणि रणबीर यांच्या घरी चिमुकल्या कन्यारत्नाचे आगमन

सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06 नोव्हेंबर :- अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी चिमुकल्या कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झाले आहे. आलियाने सर एच एन रिलायन्स रूग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. आलियाला 5 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 ला लग्न केले. ते लग्नाच्या 5 वर्ष डेट करत होते. आलिया आणि रणबीर ला कन्यारत्न झाल्यामुळे सोशल मिडीयावर चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट आता एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्ट ने मॅटरनिटी लिव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.