Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी केले रक्तदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली येथील नवजीवन वसाहत येते आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे.

नक्षल चळवळीला त्रासून मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षली आत्मसमर्पण करीत असतात. शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नक्षल्यांना नक्षल चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणाचे आवाहन केले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्मसमर्पित नक्षल्यांना शासन व प्रशासन विविध शासकीय योजनांचा लाभ देत असते.

आज ६ जून रोजी नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, पोलीस उप अधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरात १०० ते १२० आत्मसमर्पित नक्षल सदस्यांची हजेरी होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी रक्तदान शिबिरात २० आत्मसमर्पित नक्षल्यांनी स्वच्छेने रक्तदान केले.

या शिबिराला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील १ डॉक्टर व १२ टेक्निशियन हजर राहून वरील तपासण्या व रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली. शिबीर दरम्यान सामाजित अंतर ठेवून शिबीर पार पाडण्यात आले.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक गंगाधर एस ढगे व टीम सरेंडर सेल यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांचा प्रतिसाद कौतुकास्पद – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन

 

Comments are closed.