Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना प्रतिबंधक लसीकरनाचे लाहेरी येथे आयोजन

उपपोलीस स्टेशंन आणि आरोग्य विभागाचा लाहेरीत संयुक्त उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि १५ मार्च : देशभरात कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले आहे .त्यामुळे काळजी घेणे हि कुटुंबाची जबादारी निर्माण झाली आहे . वर्षभरानतर महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नवीन वर्षाच्या  जानेवारी महिन्यातच  लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू करण्यात आली आहे . या  लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आले आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रथम प्राधान्य आरोग्य कर्मचार्याना देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे . त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांचा क्रम निश्चित करून त्यांचे लसीकरण निश्चित करण्यात आले. या गटामध्ये केंद्रीय तसेच राज्य सुरक्षा दल समाविष्ट राज्यभरात करण्यात आले आहे.
याच लसीकरणाच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग गडचिरोली यांनी संयुक्त विशेष उपक्रमांतर्गत पोलिस स्टेशन पातळीवरच जिल्हा पोलिस व तैनातीस असलेले केंद्रीय तसेच राज्य राखीव पोलिस दल यांचे लसीकरण करण्याची मोहीम आखण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमांतर्गत दि १५ मार्च  रोजी उप पोलीस  स्टेशंन’ व  प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी चे वैद्यकीय अधिकारी अनिमेष जैन व डॉ नैताम यांच्या  चमुनी पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना कोविडशील्ड या लसीचा पहिला डोस दिला असून डा.नैताम वउप पोलीसनिरीक्षक  अनिमेष जैन, अविनाश नळेगावकर यांनी विशेष मार्गदर्शन केले आणि सर्व कर्मचार्यांना  लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून प्रत्येकाने लस घ्यावी.

या सोबत लस घेतली असली तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार बाहेर जावे डा.नैताम  मार्गदर्शनात बोलत होते .

आरोग्य विभागाने दिलेल्या या सेवेबद्दल प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी उप पो स्टे लाहेरीचे वतीने आभार मानले.

Comments are closed.