Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खुशखबर! रोजगाराची मोठी संधी, आयटी कंपन्यांचा ९१००० नोकरभरतीचा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. २० जानेवारी: कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यानंतर आता एक आनंदाची बातमी आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधानंतर आता मोठ्या प्रामाणात नोकरभरती होणार आहे. अनेक आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चार टॉप कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजिज आणि विप्रोने यावर्षी कँपसमध्ये ९१,००० जणांची भरती करण्याची योजना आखली आहे.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) एग्झिक्युटीव्ह व्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कडने नुकतंच प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितलं, कंपनी पुढील आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनी यावर्षी जवळपास ४० हजार कँपस हायरिंग करतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इन्फोसिस २४,००० भरती करणार

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आर्थिक वर्षात २४,००० कॉलेज ग्र्यॅजुएट्सची भरती करणार. यावर्षी कंपनीने १५,००० कँपस भरती करण्याची योजना बनवली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजिज पुढील आर्थिक वर्षात १५,००० जणांना नोकरीवर घेणार. यावर्षी कंपनीने १२,००० कँपस हायरिंग केलं होतं. विप्रो पुढील वर्षी १२,००० कँपस हायरिंग करण्याची योजना आहे. कंपनीने यावर्षीही इतक्याच भरती होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एचसीएल टेक्नॉलॉजिजचे प्रमुख एचआर अधिकारी अप्पाराव वीवी यांनी सांगितलं, हायरिंगमध्ये तेजीचे अनेक कारणं आहेत. त्यांनी सांगितलं की, कंपनी निश्चित लक्ष्यापेक्षा ३३ टक्के जास्त भरती करत आहेत. गेल्या वर्षी कंपनीने ७० टक्के भरती भारतमध्ये आणि ३० टक्के विदेशात झाली होती.

इन्फोसिसला यावर्षी सर्वात मोठी डील मिळाली. जर्मनीच्या ऑटोमोबाईल कंपनी डेमलरसोबत कंपनीची डील ३.२ अरब डॉलरची असल्याची माहिती आहे. टीसीएसला प्रुडेंशिअल फायनॅन्शिअलपेक्षा मोठी डील मिळाली. त्याचप्रमाणे विप्रोनेही जर्मन रिटेलर मेट्रोसोबत एक मोठी डील साईन केली आहे.

Comments are closed.