Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती दि,१४ सप्टेंबर : जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून सद्या  ३ मृतदेह मिळाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  आमदार देवेंद्र भुयार, मोर्शी मतदारसंघ

प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील आपल्या नातेवाईकाकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर ते सर्वजण आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. मात्र, अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार व पोलीसअधिकारी बचाव पथक घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत..अधिक तपास बेनोडा पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा,

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.