Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 110 वा दीक्षांत समारंभ 13 एप्रिल रोजी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, 12 एप्रिल :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 110 वा दीक्षांत समारंभ 13 एप्रिल अर्थात येत्या गुरुवारी दुपारी 2 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस भूषवतील. तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत , अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असून हे शैक्षणिक वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

या दीक्षांत समारंभामध्ये 1 लाख 1 हजार 722 पदवीकांक्षींना पदवी व 330 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणिह यश संपादन केल्याबाबत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 157- सुवर्णपदके 9 – रौप्यपदके व 29- रोख पारितोषिके असे एकूण 195 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणारे पदके/ पारितोषिकांमध्ये सर्वाधिक पदके व पारितोषिके डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कु. नंदिनी समीर सोहोनी हिला 7 सुवर्णपदके व 2 पारितोषिके, तर डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅड रिसर्च नागपूरचे विद्यार्थी विकी सुधाकर पडोळे याला 7 सुवर्णपदके. प्रदान होणार आहे. या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय 280 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. टेंबे स्वामी वर अध्ययन करणाऱ्या रामचंद्र परांजपे यांना एक डिलीट पदवीही प्रदान केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.