Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘सर्च’ रुग्णालयात १२ ला मेंदूविकार विशेषज्ञ ओपीडी

0

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली :  समाजामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) यासारखे मेंदूविकार अकस्मात होणार्‍या मृत्यूसाठी करणीभूत ठरत आहेत. आता सर्च रुग्णालयात नागपुर येथील मेंदूविकार तज्ञांद्वारे तपासणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. मेंदूविकार ओपीडी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारला निजोजित असून, गुरुवार १२ सप्टेंबर २०२४ ला  नागपुरचे मेंदूविकारतज्ञ डॉ धृव बत्रा तपासणी करणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मेंदूविकार ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, एपिलेप्सी, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार मिळणार आहे. गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये  ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे.
विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. १२ सप्टेम्बर रोजी होणार्‍या मेंदूविकार  विशेषज्ञ ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://youtube.com/shorts/XTwwGIl3PuM?feature=share

Leave A Reply

Your email address will not be published.