Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर परिमंडळातील २६ घरगुती ग्राहकांच्या घरी सुर्याच्या स्वच्छ प्रकाशातुन उत्पन्न होत आहे स्वस्त वीज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर  १० जानेवारी :- सौर ऊर्जेला प्रोत्साहन देताना सोलर रूफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना अनुदान देण्यात येत असून याकरीता नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाद्वारा सोलर रूफ टॉप योजना जाहिर केली आहे. या येाजने अंतर्गत आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळातील एकूण २६ घरगुती ग्राहकांच्या घरी सुर्याच्या स्वच्छ प्रकाशातुन वीज उत्पन्न होत आहे.

चंद्रपूर परिमंडलाअंतर्गत, चंद्रपूर मंडळातील (चंद्रपूर, ब्रम्हपुरी, बल्लारशा व वरोरा विभागात ) एकूण १७ तसेच गडचिरोली मंडळातील (आलापल्ली व गडचिरोली विभागात) एकूण ९ घरगुती ग्राहकांच्या छतांवर सौर संच लावण्यात आले आहेत व त्यांच्या घरी सुर्यप्रकाशातून स्वच्छ उर्जेतून वीजनिर्मींती होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे सर्व ग्राहक ज्यादा तयार झालेली वीज महावितरणला विकून उर्जादाते झाले आहेत. चंद्रपूर मंडळातील ६९ व गडचिरोली मंडळातील १७ अशा एकूण ८६ इच्छुक ग्राहकांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत व ते सर्व सुर्यप्रकाशातून स्वच्छ उर्जेतून वीजनिर्मींती करणारे उर्जादाते ठरणार आहेत. या सर्व ग्राहकांच्या घरी सौर ऊर्जेचा प्रकाश तर पडणारच पण सोबतच या ग्राहकांना ज्यादा निर्मिती झालेली वीज महावितरणला विकता येईल व सोबतच त्यांच्या विजेच्या बिलात बचतही होणार आहे.

या येाजने अंतर्गत घरगुती ग्राहकांकरीता जास्तित जास्त ४० टक्क्यांपर्यंत अनूदान देण्यात येणार आहे. महावितरणने अधिसुचना निर्गमित करत, त्यासाठी पोर्टल तयार केलेले आहे. या येाजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅटपर्यंत जोडभार असल्यास ४०टक्के अनूदान दिले जाईल. घरगुती ग्राहकांचा जोडभार १० किलोवॅट जोडभारापर्यंत असल्यास पहिल्या तीन किलोवॅटवर ४० टक्के तसेच त्यानंतर ७ किलोवॅटवर २० टक्के अनूदान दिले जाईल. तर, १० किलोवॅटपेक्षा अधिक जोडभार असलेल्या घरगुती ग्राहकांना सोलर रुफ टॉपवर कोणतीही सबसिडी या येाजने अंतर्गत नसेल. तसेच गृहनिर्माण संस्था व घरगुती कल्यान संघटनांना ५०० किलोवॅटर्यंतच्या जोडभारासाठी या योजनेतून लाभ घेता येईल. परंतु त्यासाठी प्रत्येक घरासाठी मंजूर जोडभार १० किलोवॅटर्यंतच्या मर्यादेत असावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम ग्राहकांनी निवडलेल्या संबंधित एजन्सीला द्यायची आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सबसिडीसाठी कंपनीच्या पोर्टलवर अर्ज करुन अधिकृत वेंडरकडूनच सोलररुफटॉप इच्छुक ग्राहकांना लावता येईल महावितरणच्या- www.mahadiscom/consumerportal/renewable energy portal/solar rooftop लिंकवर जावून अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. त्याबाबत तपशील महावितरण च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे व वीजबिलात बचत करण्याचे आवाहन केले आहे.

निवड झालेल्या एजंसीला सोलर रूफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना उच्चमत सेवा देण्याचे बंधन या येाजने अंतर्गत आहे. एजेंसीला आवश्यक संचाच्या सर्व सुटया भागांचा साठा करून ठेवावा लागणार आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीमध्ये या संचांचे दुरूस्ती काम करण्यासाठी सेवाकेंद्र उभारून त्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. ही सेवाकेंद्रे आठवडयातून सुटीचे दिवस वगळता सहा दिवस ८ तास सेवा देणार आहे.

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.