Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा याच महिन्यात होणार सुरु – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 15 जानेवारी: राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नुकतंच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील,  अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर दुसरीकडे येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार आहे, असे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना ही माहिती दिली होती.

“येत्या 8 ते 10 दिवसात याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, कॉलेज, वसतिगृह याबाबतचा चर्चा निर्णय घेतला जाईल. यानंतर येत्या 20 जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालय सुरु करता येतील का? काही नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरु आहे,” असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.