Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

8 वर्ष अर्णवच्या तबला वादनातून ‘अहेरीचा राजा’तील भाविक मंत्रमुग्ध

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 25 सप्टेंबर : “अहेरीचा राजा” गणेश मंडळ अंतर्गत व माजी मंत्री राजे अंब्रिषराव निर्मित राजमहलाच्या पटांगणात दररोज विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात काल एकल गायन स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमात आठ वर्षाच्या अर्णव सचिन सिडाम या चिमुकल्याने गायनासोबतच उत्कृष्ट तबला वादन करून अनेकांची मने जिंकली. राजे साहेबांसह अनेक
भाविक मंत्र मुग्ध होउन आनंद व्यक्त करीत होते.अर्णव हा वयाच्या अवघ्या साडेचार वर्षापासून त्याच्या आजोबा सोबत गायन करायला शिकला. त्याला तबला वादनाचा छंद ही आजोबा मुळेच जडला.

राजनगरीत श्रीमंत राजे अमरीशराव आत्राम यांच्या राजवाड्यात गणपतीचे आगमन झाल्यापासून दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून विविध कार्यक्रमानी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात
आहे.आजोबांच्या नवयुवक भजन मंडळ अहेरीत तो बरेचदा तबला वादन व गायन करतो.अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याचे तबला वादन बघून अनेक प्रेक्षकांनी अर्णवला कौतुकाची पाठीवर थाप देत अभिनंदन केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने स्पर्धक व प्रेक्षक उपस्थित होते. अर्णव हा सेंट फ्रान्सिस स्कूल नागेपल्ली इथे तिसऱ्या वर्गात शिकत आहे. आई वडील दोघेही शिक्षक आहेत. अर्णवला मोठं होऊन वैज्ञानिक व्हायचं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.