Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन विभागाचे मोठी कारवाई एक लाख अकरा हजार रुपयांची सागवानी माल जप्त

व्येंकटापुर उपक्षेत्रातील लंकाचेन -२ नियतक्षेत्रात घटना, आरोपी फरार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गुड्डीगुडम, 25 सप्टेंबर : वन विभागसिरोंचा अंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र कार्यालय प्राणहिता(रेपणपली) च्या व्येंकटापुर उपक्षेत्रातील लंकाचेन – 2 नियतक्षेत्रात 23 सप्टेंबर रोजी रात्री गस्त वर असताना अतिघनदाट जंगलात सागवनी 5 नग लठ्ठे 0.950 घन मीटर सागवनी माल जप्त करण्यात वन विभाग यशस्वी झाले.
गुप्त माहितीच्या आधारे प्राणहिता वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र लंकाचेन – २ मध्ये कंपार्टमेंट नंबर २८४ मध्ये सर्व क्षेत्रिय कर्मचारी मिळुन रात्र घनदाट जंगलात गस्त केली असता प्राणहिता नदी किनारी वसलेले करनेली गावा पासुन अंदाजे २ किमी अंतरावर जंगलात सागवान लठ्ठे एकूण 5 नग लठ्ठे 0.950 घन मीटर आढळून आले असता सदर परिसर शोध मोहीम केले असून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले आहे. सदर माला ची किंमत एक लाख अकरा हजार (१,११,००० ) असुन सदर माल बैल बंडी द्वारे व्यंकटापुर येथे आणन्यात आला.

सदर कारवाही माननीय उप वसंरक्षक सिरोंचा पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधकारी संजोग खडतळ यांचा नेत्रुवखाली देवलमरी चे क्षेत्रसाहयक दिनेश तेलंग, उत्तर व्येंकटापुर चे क्षेत्र सहायक प्रशांत व्ही. मल्लेलवार, वनरक्षक गणेश आडगोपुलवार, वनरक्षक साजिद कादरी, वनरक्षक राहुल सूरपाम, वनरक्षक मिथुन अहिर, वनरक्षक रुपेश येनगंटीवार, वनरक्षक रघु हिचामी, वनरक्षक प्रफुल मडावी, वनरक्षक सतीश गीते तसेच वाहन चालक सुनील कपलवार या कारवाई मध्ये उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.