Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नापिकीला कंटाळून आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची 15, डिसेंबर :-  नापिकीमुळे कर्जाला कंटाळून येथील 60 वर्षीय अस्थिर सोनकुकरा यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
दि. 12/12/2022 रोज सोमवारी त्यांनी विषारी औषध प्राषण केले. ही बाब घरच्या मंडळींना तात्काळ लक्षात आल्याने घरच्यांनी अस्थिर ला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार करुन गडचिरोली जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला गडचिरोली च्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस तिथे त्याचेवर दोन दिवस औषधोपचार करण्यात आले. परंतु आज पहाटेला दवाखान्यातच त्याचा मृत्यू झाला.

मागील 2-3 वर्षापासून तालुक्यात कोरडा दुष्काळ पडला. यावर्षी ओला दुष्काळ. त्यामुळे येथील शेतकऱ्याला कर्ज फेडता येईल एवढे धान्य झाले नाही. त्यामुळे गरिबीला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा आहे. अस्थिर सोनकुकरा यांचेकडे दोन एकर शेती आहे. येथील को- आपरेटिव्ह बॅंकेचे त्याचेवर 1.5 लाखाचे कर्ज आहे. व महिंद्रा फायनान्स कडून स्वराज ट्रॅक्टर खरेदी केले होते. नापिकी मुळे हप्ते भरने चुकले आहेत. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत त्याने टोकाची भुमिका घेतली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद कोरची पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मर्ग दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.