Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनोखा विवाह सोहळा जळगावात पाहायला मिळाला..लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवल

मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अमळनेर 10 फेब्रुवारी :- अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलाणी यांचा एकुलत्या एक मुलाचा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी 10 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात पार पडत आहे. आशिष हा इंजिनियर आहे तर सिमरन चंदानी ही सुद्धा उच्चशिक्षित असून मुलांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत.

एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा विवाह शाही थाटात व्हावा, अस गोकलानी यांचं स्वप्न होत तसेच मुलगी नसल्याने घरात येणाऱ्या सुनेला सरजु गोकलानी यांनी मुलगी मानलं. मुलगी असती तर तिचा जसा शाही विवाह केला असता, त्याच आनंदात घरात येत असलेल्या सुनबाईला तिच्या गावावरून लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी गोकलानी यांनी चक्क हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली. लाखो रुपये खर्चून हेलिकॉप्टर उपलब्ध केले. त्यानुसार त्यांनी सुनबाईला तसेच तिच्या कुटुंबियांना न कळवता , आज थेट सुनबाईला लग्नाच्या ठिकाणी अमळनेर येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांचे अंमळनेर येथे आज आगमन झाले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले… त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर दोघेही जोडपे सुरुवातीला अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचेच लक्ष वेधले. एकुलता एक मुलगा आहे, सिमरन हिला सूनबाई समजून नव्हे तर मुलगी समजून तिचा स्वीकार करत असून त्याचाच हा मोठा आनंद साजरा असल्याचे गोकलानी यांनी बोलताना सांगितले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.