वैनगंगा नदीच्या पुलावरून महिला पोलीस शिपायाने नदीत मारली उडी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
आरमोरी, 30 जून – आरमोरी शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घेतल्याची घटना घडली आहे. शारदा नामदेव खोब्रागडे (३० वर्ष) असे सदर शिपायी महिलेचे नाव असून ती मुळची (चंद्रपूर) सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. सोबत आरमोरी तहसील कार्यालयाच्या बचाव पथकाच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात संध्याकाळपर्यंत शोध घेतला, पण अद्यापही पत्ता लागला नाही. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
हे पण वाचा :-
Comments are closed.