Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कार्यतत्पर अधिकारी सोनल भडके यांना विभागीय वनअधिकारी(DFO) पदी बढती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर, रवि  मंडावार  गडचिरोली, 5 ऑगस्ट 2023 : गडचिरोली वन विभागात सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) या पदावर काम करणारे, आणि आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणारे अधिकारी सोनल भडके यांना बढती मिळाली आहे. सोनल भडके हे गडचिरोली येथे विभागीय वन अधिकारी( DFO) (वनसंपत्ती सर्वेक्षण) कार्य आयोजना विभाग गडचिरोली येथे लवकरच रुजू होणार आहेत.

राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने दिनांक 04ऑगस्ट 2023 रोजी सहाय्यक वनसंरक्षक संवर्गात कार्यरत असलेल्या 76 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये गडचिरोली वन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके (प्रादेशिक) यांचाही समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोनल भडके हे गडचिरोली वन विभागात 2017 पासून सहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत असुन, अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून वन विभागात त्यांची ओळख आहे.वन विभागातील वन कर्मचाऱ्यासह स्थानिक नागरिकांसोबत सोनल भडके यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने, सोनल भडके यांचा अनेक नागरिकांना न्याय मिळवून देण्यात मोठा हातखंडा आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी कित्येक वन तस्करांना “सळो की पळो” करून सोडले आहे. अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, करणाऱ्यांना सोनल यांनी चांगलेच जेरीस आणले आहे.

वाघांच्या तस्करीचा प्रकरणाचा धडाकेबाज तपास, सेवानिवृत वनअधिकार्‍यासह 13 आरोपी जेरबंद
देशभारत गाजत असलेल्या वाघांच्या शिकारीचे आणि तस्करी आंतरराष्ट्रीय प्रकरणाचे धागेदोरे गडचिरोली पर्यंत सापडले. विशेष म्हणजे या संवेदनशील प्रकरणाचा सोनल भडके यांनी अतिशय कुशलतेने तपास करून सेवानिवृत वनअधिकार्‍यासह 13 आरोपींना जेरबंद केले आहे. तसेच, सदर प्रकरणाची अजून चौकशी सुरु असून, यामध्ये आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील सेवानिवृत्त वनाधिकारी यांना कित्येकदा पुराव्याअभावी अटक करण्यात वन विभागाला यश आले नव्हते, मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असतात 24 तासाच्या आत दिल्ली गाठून अटक करून दिल्लीतील न्यायालय प्रकरण दाखल करून पुन्हा चौकशीसाठी गडचिरोलीत आले होते. यातील कित्येक अधिकाऱ्यांना यांची साधी भणकही लागू दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या या तपासाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुरवळा नेचर सफारी निर्माण करण्यात महत्वाची भूमिका…

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या धर्तीवरील, गडचिरोलीपासून अवघ्या 12 किलोमीटर असलेल्या गुरवळा नेचर सफारी निर्माण करण्यात सोनल भडके यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. या मधून वन पर्यटनाला चालना देत शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रचलित असताना, त्याच धर्तीवर गुरवळा नेचर सफारीचे आज देशात नाव समोर येत असून प्रत्यक्ष वाघाचे तसेच जंगलातील वन्य प्राणी पाहण्याचा निसर्ग सफारीत आनंद पर्यटक घेत आहेत. शिवाय येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना वन औषधी उद्यान, वन्यजिवांसह विविध प्रजातींच्या वनस्पतींचे निरीक्षण करता येतं. त्यामुळे ताडोबा प्रमाणे गुरवळा निसर्ग सफारी पर्यटकांना भुरळ घालत आहे.

नागरीकांसोबत सुसंवाद साधून प्रशासनाची प्रतिमा सुधारली.!

गडचिरोली वन विभागात कित्येक परिवारांना वाघाच्या हल्ल्यामुळे जीवास मुकावे लागले तर काही परिवारांतील लोकांना वाघाने गंभीर जखमी केले. ही समस्या संपत नाही तर दुसरीकडे ओडिसातील हत्तींनी गडचिरोलीत प्रवेश करून कित्येक घराची पडझड, उभ्या पिकाचे नुकसान, मनुष्य हानी केली मात्र प्रत्यक्ष गावातील नागरिकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या दुःखात आपलं दुःख समजून वन विभागामार्फत जितके जास्त मोबदला मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून सोनल यांनी दुर्गम भागातील, खेड्यापाड्यातील नागरिकांची मन जिंकून शासनाबाबत असलेले लोकांचे गैरसमज दूर करून आपुलकी निर्माण करण्यात यश मिळवले आहे हे कुणीही नाकारणार नाही. पुन्हा संधी गडचिरोलीत मिळाल्याने वन वृत्तांत कर्मचाऱ्यांसह मित्रपरिवारात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या..

राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी सहाय्यक वनसंरक्षक संवर्गात कार्यरत असलेल्या 76 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये गडचिरोली वन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके (प्रादेशिक) विभाग गडचिरोली येथून बढती होवून (वनसंपत्ती सर्वेक्षण) कार्य आयोजना विभाग गडचिरोली येथे स्थानांतर व अल्लापल्ली वन विभागात उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांची विभागीय वनाधिकारी (वन्यजीव प्रबंधक 2) प्रधान मुख्यवनसंरक्षक (वबप्र) कार्यालय येथे स्थानांतर करण्यात आले.

तर गणेश निवृत्ती पाटोळे सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव (1) चांदोली राष्ट्रीय उद्यान विभागीय वनाधिकारी वन्यजीव चांदोली यांचे कार्यालय स्थित कराड येथून गडचिरोली वनवृत्त गडचिरोली येथे विभागीय वनाधिकारी (दक्षता) येथे आणि नंदकिशोर रघुवीर राऊत उपसंचालक(1) वन प्रशिक्षण संस्था जालना येथून गडचिरोली वनवृत्त गडचिरोली येथील विभागीय वन अधिकारी (तेंदू )या ठिकाणी नव्याने रुजू होणार आहेत. त्यामुळे गडचिरोलीत वनवृत्तात, वनाचे रक्षण व संवर्धनास मोठी मदत होणार आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.