Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर करणार कारवाई – अहेरी एसडीपीओ व मुक्तीपथची बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २७ मार्च : अहेरी व जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांची बैठक पार पडली. उपविभागात येणाऱ्या ११ पोलिस ठाण्यांतर्गत अवैध दारू व तंबाखूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऍक्शन प्लॅननुसार ठोक विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.  

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तीपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने अहेरी उपविभागीय स्तरावर बैठकीचे आयोजन करून अवैध दारू व तंबाखू विरोधात कारवाई करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी त्रासदायक गावांची यादी तयार करण्यात आली. पोलीस स्टेशनला अवैध दारूच्या तक्रारी १५ दिवसात निकाली काढणे. दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, पोलीस बिट अंमलदार, पोलीस पाटील, मुक्तीपथ तालुका संघटक यांची बैठक होणे गरजेचे आहे. ज्या गावात किंवा वार्डात रेड करणे आहे. त्या गावातील पोलीस पाटील यांनी अवैध दारूविक्रेत्यांची माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देणे. ड्रंक अँड ड्राइव्ह कायद्याची अंमलबजावणी करणे. १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे. दर दोन महिन्यातून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, जिमलगट्टा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक देवानंद बगमारे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.