Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुधामध्ये मध टाकल्यास वाढते ताकद !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

निरोगी आरोग्यासाठी रात्री झोपतांना किंवा सकाळी नाष्ट्यामध्ये दुधाचा समोवश केला जातो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन हे तिन्ही गुणधर्म असतात. दुधामध्ये एक चमचा मध मिसळून प्यायल्याने त्याच्य अनेक औषधी गुणधर्माचा शरीराला फार मोठा उपयोग होतो. मधात एन्टी बॅक्टेरियटल गुण असल्याने ते आपले रोगांपासून रक्षण करते. अशात जर दुध आणि मध सोबत घेतले तर आपल्या आरोग्याला याचा खुप फायदा होतो.

दुधात मध मिसळून प्या, सर्वप्रथम दुध गरम करून घ्यावे. कारण कच्च्या दुधात बॅक्टेरिया असु शकतात. त्यानंतर एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध टाका. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्या आणि काही दिवसातच तुम्हाला फायदे दिसू लागतील. दुध आणि मध दोन्हीही इम्यूनिटी बूस्टर प्रमाणे काम करतात. दुधात मध मिसळून घेतले तर आपली इम्यूनिटी वाढते सोबतच बर्याचश्या आजारांपासून लढण्याची ताकद देते. दुधात मध टाकून घेतल्यास सर्दी, पडसे आणि खोकल्यातही आराम मिळतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुधात मध टाकून घेतल्यास शरीरातील थकवा दूर होतो सोबतच शारीरिक कमतरता देखील दूर होते. असे दुध प्यायल्याने रात्री झोप छान लागते आणि झोप चांगली झाल्याने सकाळी शरीरात उर्जा देखील जाणवते. दुध शरीराला मजबूत बनवते, पण फक्त दुध पिण्यापेक्षा आपण सोबत जर मध घातले तर आपले कमी झालेले वजन वाढण्यास मदत होते. मधातील कॅलरीज आणि काब्र्स दुधातील हेल्दी फॅट्स सोबत मिसळून वजन वाढवण्यास मदत करते.

मधात असलेले एंजाइम आपले पाचन तंत्र मजबूत बनवते. रात्री झोपतांना मध आणि दुधाचे मिश्रण प्यायल्याने अन्नाचे पचन व्यक्स्थित होते. अशा प्रकारे दुध प्यायल्याने बुध्दकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचनावर मात करता येते. पोट साफ करण्यासाठी दूध आणि मधाचे मिश्रण नक्कीच घेतले पाहिजे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

देसाईगंज येथील ए ए एनर्जीत झालेल्या विस्फोटात एकाचा मृत्यू, एक गंभीर

युवकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे – खा.अशोक  नेते

 

Comments are closed.