Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या नंतर मंत्रीपदासाठी मराठवाड्याच्या आशा पल्लवित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. ३ मार्च: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा आहे. मात्र या राजीनामा नंतर मराठवाड्याच्या आशा मंत्रिपदा साठी पल्लवीत झाल्याचे चित्र आहे यात भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना वनमंत्री करा अशी मागणी संपूर्ण मराठवाड्यातून होत आहे. आज अमित घाडगे यांनी माध्यमाच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी तानाजी सावंत वनमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे.

अमित घाडगे म्हणाले, तानाजी सावंत यांच्यासाठी का होत आहे मंत्री पदाची मागणी. सामान्य कार्यकर्त्यांच्या कायम पाठीवर हात सावंत यांचा असतो त्याच बरोबर गोरगरिबांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारा नेता म्हणून सावंत याना मराठवाड्यात ओळखले जाते. सावंत यांना मंत्री पद दिल्याने शिवसेनेला महाराठवाड्यात मोठा फायदा होऊ शकतो. सावंत यांचे मराठवाड्यात मोठे कार्यकर्तेच नेटवर्क आणि त्याला जोडून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य त्यामुळे सावंत यांच्या वेगळा प्रभाव मराठवाड्यावर आहे आणि याचा मोठा फायदा शिवसेना पक्षाला होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.