Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रमजीवी संघटनेची “आई सन्मान मोहिम” सुरु

मुलाच्या नावापुढे वडिलांसोबत आईचेही नाव समाविष्ट करण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी   पालघर 5 डिसेंबर :-  श्रमजीवी संघटने कडून “आई सन्मान” मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्त्री सन्मानसाठी सर्व शासकीय व खाजगी दस्तऐवजांवर मुलाच्या नावापुढे वडिलांसोबत आईचेही नाव समाविष्ट करावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेद्वारे शासनाकडे केली आहे.

श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात “आई सन्मान” मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील गावागावात, ग्राम पंचायत कार्यालय, पंचायत समिती तसेच नगरपरिषद, नगरपंचायत नगर महानगरपालिका यांच्या कार्यालयात जाऊन “जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या नावासमोर वडिलांच्या नावासोबतच आईचे नावही लिहावे, सर्व शासकीय खाजगी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाची नोंद करावी” अशा मागणीचे निवेदन देत आहेत. तसेच संबंधित यंत्रणांद्वारे तसा ठराव ही मंजूर करून घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या मागणीला पाठबळ मिळावे यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक आमदार – खासदाराला देखील अशा प्रकारची निवेदन देणार असून, लवकरच याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा म्हणून श्रमजीवी संघटना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. पत्र देखील लिहिले आहे. श्रमजीवी संघटनेच्या या आई सन्मान मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.