Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई 2 फेब्रुवारी :- अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या
विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत.
स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज गुरुवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या.

आज झालेल्या १० परीक्षा 
सकाळचे सत्र : परीक्षा -२
१. एमए सत्र ४
२. एमए हिंदू स्टडीज
दुपारचे सत्र : परीक्षा – ८
१. एमएस्सी सत्र ४
२. एमकॉम सत्र २ (सिबीजीस)
३. एमकॉम सत्र २ (चॉईसबेस)
४. एलएलबी सत्र ३
५. एलएलबी / बीएलएस सत्र ३ (५ वर्षीय )
६. एमकॉम भाग १ (वार्षिक)
७. बी.व्होक. हेल्थ केअर सत्र ५
८. बी.व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.