Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पातील स्फोटातील भाजलेल्या तिघांचाही मृत्यू; प्रशासनाच्या हलगर्जीपणा .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उरण, 12,ऑक्टोबर :- उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात काल झालेल्या  बॉयलरचा स्फ़ोटातील आज अखेर तिघांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.

रविवारी काळी नेहमीप्रमाणे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक  बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंप हायप्रेशरने फुटला. सदर पंपातील उकळते पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजले आहेत. यामध्ये ज्युनियर इंजिनिअर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा. उरण-डोंगरी) व लेबर विष्णू पाटील (रा. उरण बोकडविरा) हे जबर जखमी झाले होते.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यातील विवेक धुमाळे यांचे त्याच दिवशी म्हणजे रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. बोकडविरा गावातील विष्णू पाटील या तरुणाचा सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. तर तिसरा जखमी कुंदन पाटील याचेही आज दुपारी निधन झाले आहे. यामुळेआगीत भाजलेल्या ३ जणांचा अखेर मृत्यू झाला आहे.

मयत विष्णू पाटील हे कंत्राटी कामगार असल्याने त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन म्हणून त्यांच्या पत्नीला केंद्रात कायमस्वरूपी नोकरी व ५० लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचा प्रस्ताव सोमवारी केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी महाजनकोच्या संचालकांना पाठविला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कंपनी प्रशासनाने आज स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी जखमींना व त्याच्या कुटूंबियांना योग्य न्याय मिळत नसल्याने मयत विष्णू पाटील यांची बॉडी कंपनी गेटसमोर आणून आंदोलन करण्यात आले होते. यानंतर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जिप सदस्य विजय भोईर, जेएनपीए माजी ट्रस्टी भूषण पाटील, शिवसेना नेते महादेव घरत, लक्ष्मण ठाकूर, संध्या ठाकूर, किरण घरत, दर्शन घरत व बोकडविरा डोंगरी, फुंडे व भेंडखळ सरपंच व सदस्य उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी सुप्रीडेंड इंजिनिअर एस. एल. वाघ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सरळ सरळ कंपनीच्या हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे कबूल केले.  तसेच गेली ३ वर्षे सेफ्टी ऑफिसर व आरोग्य सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती वाघ यांनी पत्रकारांना दिली. यावेळी घटना घडूनही कंपनीत फिरत असताना सबधित अधिकारी वर्ग ही कोणतीही सुरक्षा उपकरणाचा वापर करीत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. या कंपनीत अनेक प्रकारचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी या घटनेचे व सुरक्षिततेचे गांभीर्य विचारात घेऊन याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.

हे देखील वाचा :-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह वादाच्या भोवऱ्यात नवे ट्विस्ट समता पार्टी ने केला दावा.

Comments are closed.