भूत, प्रेत, आत्मा पळवून टाकतो म्हणून महिलेशी असभ्य गैरवर्तन करणाऱ्या भोंदूबाबासह महिलेच्या पतीस अटक.
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादेव खोरी येथील घटना .
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अमर घटारे अमरावती ब्युरो
अमरावती दि ३० ऑक्टो :- जग विज्ञानाचे नवनविन संशोधन करीत आहें प्रत्येक आजार असेल अथवा कुठलाही विषय असो संशोधन करीत असताना अमरावती सारख्या महानगरात अंधश्रद्धेचा खेळ आजही पहायला मिळत आहें. अंधश्रद्धा निर्मुलन सारख्या संस्था जागोजागी अंधश्रधेचे अघोरी प्रयोग कसे करतात याचे प्रयोग करून दाखवीत नागरिकाना जागृत करण्यात येत असतात तरी हि महानगरात अंधश्रध्दा दिसून येते . महिले ची पत्नीची प्रकुर्ती वारंवार बरी नसल्याने चक्क पतीने ढोंगी बाबा वर विश्वास करून अंधश्रद्धे कळस गाठला हि घटना अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादेव खोरी येथिल असून उघडकीस आली आहें. ढोंगी बाबा याने महिला सतत आजारी असल्याने तिच्या अंगात भूत शिरल असल्याने ढोंगी बाबा यांनी सांगीतले त्या ठरल्याप्रमाणे महिलेच्या अंगातील भुत काढण्यासाठी ढोंगी बाबा याला बोलविण्यात आले . प्रत्येक नागरिकाला औषध उपचार घेवून बरे होत नसेल तर प्रयत्न करीत असतात आणि अश्याच प्रयत्नात ढोंगी बाबा ने आपला डाव मांडला .

सुरुवातीला भोंदूबाबाने महिलेला हळद लावून तिचा विनयभंग केला तर तिच्या घरात भूत प्रेत काढण्यासाठी अघोरी पूजा केली,मात्र नको त्या जागी मांत्रिक तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने महिलेला ढोंगी बाबा लज्जास्पद वागणूक लक्षात येताच सदर महिलेने हिमतीने पाऊल उचलले आणि शहरातील फ़्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तर पोलिसांनी मांत्रिका सह तिच्या पतीला अटक केली या घटनेनंतर अमरावतीत खळबळ उडाली आहे त्यामुळे भोंदू बाबाचं बिंग फुटलं..या प्रकरणी भोंदू बाबा राजू गुढदेसह महिलेच्या पतीला पोलीसानी अटक केली तर आरोपी भोंदूबाबा विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .
Comments are closed.