Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतप्त महिलांनी मार्गांवरच केली धान रोवनी; रस्त्यावर गुडघाभर चिखल.धाबा ग्रामपंचायत दुर्लक्ष

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 05 ऑगस्ट – गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढून जावे लागत आहे.तसा प्रश्न गंभीर असताना कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. ग्रामपंचायतकडे तसे निवेदन तोंडी सूचना करून ही ग्रामपंचायत अंत्यत महत्वाच्या प्रश्नावर अक्ष्यम दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी गुडघाभर चिखलात रोवने करून ग्रामपंचायत च्या कारभारावर अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे. रोज या मार्गावरून कुणी ना कुणी घसरतेयं. चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेत जावं लागतं. याला वैतागलेल्या बेघरवस्तीतील महिलांनी आज चिखलमय मार्गावरच धान रोवणी केली. सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मजुरी बुडवून महिला एकत्र आल्यात. त्यांनी मार्गावर साचलेल्या चिखलात रोवणी करून प्रशासनाच्या निषेध केला.राजुरा विधानसभा क्षेत्रात धाबा गाव येतयं. या क्षेत्राचे आ.सुभाष धोटे आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. आ. धोटे यांनी या वस्तीत विकास कामासाठी काही निधी दिला होता. मात्र धाबा ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी हात आकुडता घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मंदिरासाठी करोडो रुपयाचा निधी दिला. त्यांच्या कार्यकर्त्यांची ती मागणी होती. त्यांच्या कार्यकर्त्यांना येथील माणसांचे दुःखद दिसेना, इतके ते आंधळे झाल्याचं आता बोलले जात आहे. संतप्त महिला आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधले आहे.

 

Comments are closed.