Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी फुकट संत्री वाटून केला राज्यसरकारचा निषेध!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १४ डिसेंबर: विदर्भातील अमरावती व नागपूर जिल्हात मोठ्या प्रमाणावर संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते, मात्र आता संत्राला भाव नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी फुकट संत्री वाटून राज्यसरकारचा निषेध नोंदवला, संत्र्याचा भाव नसल्याने संत्राबागेत संत्री झाडाला पडून आहे, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करा, तर वरुड मोर्शी येथील रखडलेला संत्रा प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी फुकट संत्री वाटले यावेळी फुकट संत्री घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती,यावेळी संत्रा उत्पादन शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी करण्यात आली तर विदर्भातील नागपुरात अधिवेशन झाले की संत्राला न्याय मिळत होता मात्र मुंबईत अधिवेशन घेण्यात आल्याने संत्राला न्याय मिळत नाही असा आरोप भाजपने केला.

Comments are closed.