Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झनकारगोंदी फाट्यावर वीज वितरण कंपनीच्या विरोधात पुन्हा बेमुदत चक्का जाम आंदोलन

12 एप्रिलच्या आंदोलनाची तीव्रता अधिक .मागण्या मान्य झाल्याशिवाय चक्काजाम आंदोलन घेणार नाही मागे. सर्वपक्षीय नेत्यांची एक मुखी मागणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कोरची, 11 एप्रिल :-गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 120 किलोमीटर अंतरावरील आदिवासी, डोंगराळ,अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावाला कंटाळून 12 एप्रिल ला होणार पुन्हा झंकारगोंदी फाट्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन. विजेच्या लपंडावाने त्रस्त कोरची तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपासून सर्वपक्षी पदाधिकाऱ्यांनी 4 ऑगस्ट 2020 ला झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले होते.यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे सुद्धा आंदोलनात सहभागी होऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावण्यासाठी लोकांसह रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी लोकांच्या मागणीची गरज आणि तीव्रता लक्षात घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून, कोरची तालुक्यातील विजेचा प्रश्न नेहमीसाठी कसा सोडवता येईल, यावर सल्लामसलत करून काही दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते. हा मोर्चा सतत आठ तास चालला होता.

विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी सर्वच मंडळी यावेळी उपस्थित होते. सदर गोष्टीला दोन वर्ष झाली परंतु ही समस्या अद्याप मार्गी लागले नाही. त्यामुळे नाईलाजाने पुन्हा कोरची तालुक्यातील सर्व पक्षाचे पुढारी गण दिनांक 9 एप्रिल 2023 ला कोरची येथील हनुमान मंदिरात गोळा झाली व जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असे ठरवून तशा प्रकारचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आज दिनांक 10 एप्रिल 2023 ला सर्व पक्षाचे पदाधिकारी व गावकरी यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोमनाथ माळी व पोलीस निरीक्षक अमोल फरतडे यांना देण्यात आले. निवेदनानुसार मागण्या याप्रमाणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरची तालुक्यात विद्युत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा इथून आणि गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथून विद्युत पुरवठा केला जातो. कोरची ते कुरखेडा दरम्यान २० किमी अंतरावर घनदाट जंगल आहे. त्याच प्रमाणे कोरची ते चिनगढ़ दरम्यान २२ किमी अंतरावर घनदाट जंगल आहे. त्यामुळे कोरचीला कुरखेडा आणि चिचगड वरून येणारा विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजूनी येणारी विज जोडणी” एरीअल बंच केबल” द्वारे जोडणी करण्यात यावी. कोरची तालुक्यातील 133 गावे असून या संपूर्ण गावांचा भार कोरची येथील ३३ केव्हीवर आहे.तसे असले तरी कुरखेडा आणि चिचगड वरून कोरची साठी फक्त २४ केव्ही विद्युत पुरवठा प्रत्यक्षात केला जातो. त्यामुळे कमी दाब होत असल्याने कोणतेही जड उपकरणे चालत नाही. आणि म्हणून कुरखेडा येथे १३२ केव्ही चे सब सेंटरची निर्मिती करावी आणि कोरचीला ६६ केव्ही विज सब सेंटरची निर्मिती करण्यात यावी. कारण कोरची वरून नवनिर्मित ढोलडोंगरी सब सेंटरला ३३ केव्ही विज पुरवठा होणार आहे.

विज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चिचगड वरून कोरची ला नियमित विज पुरवठा करण्याचे हमी पत्र लिहून दिले असतांनाही कोरची ला विद्युत पुरवठा करण्यास भंडारा विद्युतवितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कोरचीला विद्युत पुरवठा करण्यास मनाई करतात. त्यामुळे त्यांच्यावरती योग्य कार्यवाही करून विचगड वरून कोरची ला नियमित विद्युत पुरवठा करण्यात यावा. कोरची येथे ३३ केव्ही सब सेंटर मध्ये ३० वर्ष जुनी उपकरणे असून त्यामुळे विद्युत पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नवीन उपकरणे बसवून नियमित खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा.कोरची हे तालुक्याचे मुख्यालय असून यात सर्व शासकीय कार्यालये व अति आवश्यक असलेले ग्रामीण असल्याने कोरची फिडर वेगळा करण्यात यावा.कोरची तालुक्यात गेल्या ४-५ वर्षापासून कृषी पंपाची संख्या वाढत असून कृषी पंपांना पाहिजे त्या दाबाचा विद्युतपुरवठा मिळत नाही. त्यामुळे कृषी पंप चालविणे अडचणीचे होते. त्यामुळे कृषी पंपाचे फिडर वेगळे करण्यात यावे. आदि मागण्यांचे निवेदन दिले आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवेदन देतेवेळी सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, सचिव नंदकिशोर वैरागडे, उपाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, सह सचिव आनंद चौबे, कोषाध्यक्ष मनोज अग्रवाल, संघटक सियाराम हलामी, प्रसिद्ध प्रमुख शालीकराम कराडे, हकीमुद्दीन शेख, धनिराम हिडामी, झाडुराम सलामे, डॉ. नरेश देशमुख, अशोक गावतुरे, डॉ. शैलेन्द्र बिसेन, सदरूद्दी भामानी, राजेश नैताम, घनश्याम अग्रवाल, नितीन रहेजा, रामसुराम काटेंगे, रामकुमार नाईक, हिरा राऊत, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, वसिम शेख, हर्षलता भैसारे , कुमारीताई जमकातन, ज्योतीताई नैताम, ममता सहारे, गिरजाताई कोरेटी, चेतन किरसान, पद्माकर मानकर, निकाबाई थाट, सदाराम नुरूटी, सुदाराम सहारे आदि मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Comments are closed.